महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती ‘’वाचन प्रेरणा दिन ‘’म्हणून साजरा करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसन सर उपस्थित होते.
मान्यवर प्राचार्य श्री.जमीर शेख सर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचाविषयी अनमोल मार्गदर्शन विध्यार्थीना करीत हे एक भारतीय शास्त्रज्ञ होते, माझी राष्ट्रपती स्व.डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्मुती जतन करण्याच्या उद्धेशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावे.
तसेच त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन तसेच त्यांनी २००२ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती होते, तसेच त्यांनी शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन, विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे काम केले.अशा प्रकारे बॉलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले . शिक्षण,लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले,भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले.
या कार्यक्रमाला विभाग प्रमुख प्रा.डॉ. शिंगारे,प्रा.नगराळे, प्रा.पोहनकर ,प्रा.ठाकरे,प्रा.सोडवले,प्रा.बाबरे,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आणि कार्यक्रमाला विध्यार्थीचा उस्फुर्त प्रतिसात होता.