शरद पवारांवरील निलेश राणेच्या टीकेला रोहित पवारांचे चोख उत्तर म्हणाले……

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

निलेश राणेंनी काय टीका केली होती ?
साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा?,” असं म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवारांचं उत्तर-

रोहित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.

Previous post कांदा जीवनावश्‍यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे––– राज्य मंत्री बच्चू कडू
Next post निलेश राणे एकेरीवर आले…रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News