टाळेबंदीतही रस्ते अपघातात 300 मृत्यू अनेक जन मिळेल त्या वाहनाने आपला प्रांत गाठण्याच्या प्रयत्नात

0 0
Read Time:2 Minute, 3 Second

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असला तरी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात, एप्रिलमध्ये राज्यभरात ५७६ अपघाताच्या घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर २७४ जण गंभीर जखमी झाले. अत्यावश्यक सेवेसाठीची वाहतूकच सुरू असताना झालेल्या या अपघातांत मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे ही शहरे आघाडीवर आहेत
टाळेबंदी असली तरी अनेकजण मिळेल त्या वाहनाने प्रांत गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. काहींनी चालतच गावचा रस्ता धरला आहे. अनेकदा नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक के ली जात आहे. शहर व ग्रामीण भागातही टाळेबंदीचा नियम नागरिकांकडून पाळला जात नाही आणि सर्रास वाहने बाहेर काढली जात आहेत. रस्ते, महामार्ग मोकळे असल्याने बेदरकारपणे वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, मोबाइलवर बोलताना वाहन चालवण्याचे प्रकार होत असून त्यामुळेच अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. त्यातच रस्त्यावर वाहनेच नसल्याने काही शहरी भागांतील सिग्नल यंत्रणाही बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना बेदरकारपणे वाहन चालवण्यासाठी आणखी मोकळीक मिळाली. राज्यात एप्रिल २०२० मध्ये ५७६ अपघात झाले. यामध्ये २८० प्राणांतिक अपघातांत २६१ पुरुष आणि ३९ महिलांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post फडणवीसांनी घेतली गुप्त बैठक पंकजा मुंडे- एकनाथ खडसेंविरुद्ध नवा डाव?
Next post एक देश एक रेशनकार्ड’ची योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News