विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ;सर्व डमी अधिकृत अर्ज मागे

विधिमंडळ भाजपच्या गोपछडे,लेले तर राष्ट्रवादीच्या पावस्कर,गर्जे यांची माघार

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषदेच्या 9 जागेसाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. 9 जागेसाठी दाखल झालेल्या 14 अर्जापैकी 1 अर्ज बाद तर भाजपच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असून धक्कादायक म्हणजे भाजपच्या घोषित झालेल्या डॉ अजित गोपछडे या अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघे घेतला असून रमेश कराड या राखीव उमेदवाराचा अर्ज पक्षांकडून कायम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
विधान परिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत मुख्यमंत्र्यांसह 5 तर दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे डमी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर भाजप कडून चार अधिकृत तर दोन डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.शिवाय शाहबाज राठोड या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी दाखल केली होती.मात्र त्यांचा अर्ज आमदारांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून डमी अर्ज भरलेले किरण पावस्कर व शिवाजी गर्जे यांनी उमेदवारी मागे घेतली.
यात विशेष म्हणजे दिल्लीतून भाजपच्या उमेदवारांची यादी जाहिर झाली होती. त्यात अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश होता . त्यांनी उमेदवारी दाखलही केली होती. परन्तु अचानक पणे गोपछडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून राखीव उमेदवार रमेश कराड यांचा अर्ज कायम करण्यात आला आहे. सोबतच संदीप लेले यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. गोपछडे यांची उमेदवारी मागे घेण्यामगे वंजारी समाज नाराज असल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रमेश कराड यांची उमेदवारी कायम केले असल्याचे सांगितले जात आहे.

बिनविरोध झालेले विधान परिषद आमदार

शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नीलम गोरे

भाजप
प्रवीण दटके,
रमेश कराड,
गोपीचंद पडवळकर,
रणजीतसिंह मोहिते पाटील

राष्ट्रवादी
अमोल मिटकरी
शशिकांत शिंदे

-कॉंग्रेस-
राजेश राठोड

Previous post धानोरा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट.. तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने गावकऱ्यांना दिलासा.
Next post भाजपने विधानपरिषदेचा चौथा उमेदवार बदलला, अजित गोपचडे यांना हटवून ‘या’ नेत्याला दिली संधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News