धानोरा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट.. तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने गावकऱ्यांना दिलासा.

0 0
Read Time:2 Minute, 12 Second

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :

माहूर येथे आढळून आलेल्या धानोरा (सा) येथील कोरोना बाधित रुग्णामुळे जिल्हा प्रशासनासह पंचक्रोशीत खळबळ निर्माण झाली होती. तालुका प्रशासनाने कमालीची खबरदारी घेत गाव सिमा बंद करुन बाधिताच्या संर्पकातील अनेक नागरिकांना मरसुळ कोविड सेंटरमध्ये दाखल केले या पार्शभूमिवर जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी धानोरा येथे भेट देवून गावकऱ्याशी संवाद  साधत धानोरा येथील तपासणीसाठी पाठविले अहवाल नकारात्मक आल्याचे सांगत भिती न बाळगण्याचे आवाहन केले.
बाधिताच्या संर्पकात आलेल्या बारा व्यक्तीचे थ्रोट स्वॅब यवतमाळच्या स्व. वसंतराव नाईक वैद्यकिय महाविद्याल्यातून नागपूर पाठविण्यात आले होते त्यामध्ये बाधीताच्या कुंटूबासह इतर अहवाल नकारात्मक आले मात्र बारा पैकी एकाचा थ्रोट स्वॅबचा अहवाल उशिरा पाठविल्याने तो रिपोर्ट अप्राप्त आहे त्यामुळे गावकऱ्यासह प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे समवेत उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडनिस , तहसिलदार रुपेश खंडारे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, ठाणेदार मोतीराम बोडखे, तालुका आरोग्य अधिकारी दादासाहेब ढगे, सरपंच डॉ.प्र.भा. काळे, ग्रामसेवक प्रकाश राठोड, किसन जाधव, प्रशांत देशमुख , अजय देशमुख , वैद्यकिय कर्मचारी यांचे सह काही गावकरी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा साधेपणा, ताफा थांबवला आणि…
Next post विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ;सर्व डमी अधिकृत अर्ज मागे

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News