सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ उत्साहात साजरा…..

                   महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  येथे भारतीय ग्रंथालय व माहिती शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. 

     या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पद्मनाभ गाडगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “जास्तीत जास्त वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते आणि विविध विषयांवर प्रभुत्व मिळवण्यास मदत होते. वाचनातून मिळणारे ज्ञान आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते.”

     कार्यक्रमात पुढे बोलताना संस्थेचे उपप्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दररोज पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञान हे संपूर्ण आणि विश्वासार्ह असते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेटवरील माहितीचा वापर करताना आपण त्याची सत्यता तपासत नाही. त्यामुळे पुस्तकांचे वाचन अधिक महत्त्वाचे आहे.” तसेच  ग्रंथाल्याबद्दल माहिती देऊन    ,विधार्थी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर प्रमुख यांनी ग्रंथाल्याबद्दल आवश्यक माहिती नोंद करून घेतली आणि ग्रंथालयाचा कसा उपयोग करावयाचा,तसेच माहिती व ग्रंथाचा शोध कसा घ्यावयाचा ह्या संबधी मार्गदर्शन केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्निकच्या विध्यार्थ्याना परीक्षेत सुयश
Next post सोमय्या ग्रुप येथे १५ ऑगस्ट दिन उत्सहात साजरा

3 thoughts on “सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ उत्साहात साजरा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News