MSPM ग्रुपतर्फ विध्यार्थ्यांसाठी (महिला सुरक्षा ) कायदा विषयी सेमिनार
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित MSPM ग्रुपतर्फ विध्यार्थ्यांसाठी (महिला सुरक्षा ) कायदा या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते , सोमय्या पॉलीटेक्नीकचे डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर ,प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे,उपप्राचार्य जमीर शेख,प्रा.धनश्री कोटकर,प्रा,राजकुमार,प्रा.हरणे मंचावर उपस्थित होते,
त्यामध्ये प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.मृणाली धोपटे ह्या जनता कॉलेज येथे कार्यरत होत्या,तसेच त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार मिळाला असून त्यांनी महाराष्ट्र शासन ,ज़िल्हा न्याय मंडळ १३ वर्ष काम केले,तसेच बाल कल्याण समिती येथे ४ वर्ष राज्यपाल नियुक्ती महाराष्ट्र कार्यरत होत्या, महिला सशक्तीकरण आणि मुलामुलींमध्ये भेदभाव दूर करण्याच्या उद्धेशाने ) कायदा या विषयावर माहिती दिल्या जाते. मुलींची व महिला सुरक्षा दिनाविषयी बोलत
”महिलांचा करा सन्मान,देश बनेल महान”,
महिला सशक्तीकरण आणि मुलामुलींमध्ये भेदभाव दूर करण्याच्या उद्धेशाने ) कायदा या विषयावर माहिती दिली. महिलांचा सन्मान,आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो ,तसेच आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात,मात्र पहिले असे नव्हते,पुर्वीच्या महिलांना शिक्षण,नौकरी आणि मतदान करण्याचा अधिकार नव्हता, पण आता तसे नाही आहे,तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आता मुलांमध्ये संस्कार रुजविणे गरजेचे आहे,त्यामुळे मुलींची व महिलाची सुरक्षा ही संपूर्ण परिवाराची आहे आणि विधार्थाना सक्षम बनविणे ही शिक्षकांचे ध्येय असायला पाहिजे.
शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी,परिणामकारक,ज्ञानसम्रुध्द असेल तेवढे ते विध्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले
तसेच विधार्थांना मौलाची माहिती दिली आणि काळजी घेण्यास सांगितले.
सूत्रसंचालन अपूर्वा वर्मा संगणक विभागातील विधार्थिनी ,पायल रामटेके संगणक विभागातील असून मार्गदर्शन प्रा.हरणे मॅडम यांनी केले.