महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक, मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी एन्ड ज्युनियर सायन्स काॅलेज, प्रायव्हेट आय.टी.आय. वडगांव,चंद्रपूर येथे 2021 नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर सर, उपाध्यक्ष श्री. पीयुष आंबटकर सर, रजिस्टार श्री. राजेश बिसन सर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, मॅकरून स्टूडेंट अॅकेडमीचे प्राचार्य श्री. रोशन रामटेके सर, प्रायव्हेट आय.टी.आय. चे प्राचार्य श्री. मनिष हिवरे सर उपस्थित होते.
नविन वर्षातील कार्यक्रमाची सुरूवात संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भाषण देत असतांना मागील वर्ष 2020 हे खूप कठीण होते, 2020मध्ये कोरोनारूपी भळभळती जखम दिली ही जखम भरून काढण्यासाठी आपल्याला काही नियमाचे पालन करावे लागले, तसेच कोविड-19 जन्मलेला कोरोना या विषाणूने हाहाकार उडवून दिला,पण कोरोना रणक्षेत्रात न घाबरता सर्वानी आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पडली.
तसेच नविन वर्ष हे सुखमय,मंगलमय जावो अशा शुभकामना देउन,नव्या उमेदीने झेप घेत नवर्षाचे स्वागत करत,केक कापून शूभेच्छा दिल्या,शिक्षकांनी नव्या संकल्पना केल्या, काही आपले ध्येय पूर्ण करण्याची नव्या जुन्या आठवणी सांगत आपले विचार मांडले. कोरोना हा आपल्याला बरेच काही शिकवून गेला, पर्यावरणाचे सौरक्षण करणे,परीसर स्वच्छ ठेवणे, आपातकारीन एकमेंकांची मदत करणे असे सांगत नविन वर्षाचे स्वागत केले.
तसेच कोविड-19 चे भान ठेवून आणि नियामाचे पालन करून नविन वर्षाचा आंनद घेतला. हया कार्यक्रमाध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.