
मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी वडगाव येथे राष्ट्रीय क्रीडादीना निमित्य योगाचे महत्व विध्यार्थाना पटवून दिले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर, यांच्या मार्गदर्शनात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आले.
मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी प्रांगणात विविध खेळ घेण्यात आले, विध्यार्थाना सहजयोग ध्यान साधनेचे लाभ ,शारीरिक विकार उत्पन्न होत नाही,शारीरिक,मानसिक दोष दूर होऊन तो संतुलित होतो. राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून औचित्य साधून योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर, योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसंरत प्राप्त होते. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे.दररोज योग केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो,शरीर आणि मन शांत करण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो. योगा केल्यानी शरीराला ऊर्जा मिळते,तसेच यामुळे श्वसन,ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.योगामुळे तणाव दूर होतो,चांगली झोप लागते.योग विषयी विध्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना योगा हि भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे,
या कार्यक्रमाला योगा प्रमुख सुचिता गुप्ता,आरती पंजाबी,संदीप वीणा लक्ष्यवाणी,विजया पिदूरकर,स्नेहल ,देवलकर,सीमा घडीनकर यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.यामध्ये हरणे मॅडम,प्रवीण सर,अमित सर सुनील सर,क्रीडा प्रमुख सचिन सर,शेंडे सर, अर्चना मॅडम,संगीता मॅडम, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.