महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि नवीन वर्षाचे २०२३ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव प्रीती पी.आंबटकर,प्राचार्य फैय्याज अहमद,प्राचार्य राजद सिद्दकी,प्राचार्य आशिष वांडरे,प्राचार्य मनीष हिवरे, प्राचार्य श्री. जमीर शेख, ,रजिस्ट्रार श्री.बिसन सर उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्वलन केले आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
मॅट्रीकोला २०२३ मध्ये सोमय्या तंत्रनिकेतन,सोमय्या करियर इन्स्टिट्यूट,सोमय्या आय. टी. आय.विधार्थांचा सहभाग होता. तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षीय आणि डायरेक्ट द्रुतीय प्रवेशित विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,प्रथम वर्षातील विधार्थामधून मिस्टर फ़ेशर गुंजन पेटकर व मिसेस फ़ेशर लेखा हाडगे निवडण्यात आले, तसेच मिस्टर अटीट्युड आदित्य बेले, मिस्टर हॅंडसॉम अस्मित बदखल,मिसेस ब्युटीफुल हिमनशी अत्रे,मिसेस बेस्ट स्माईल साक्षी शेरकर,त्याच प्रमाणे या कर्यक्रमामध्ये सांस्कृतिक समूह नुत्य,गीतगायन,एकलनुत्य स्पर्धेचे आयोजनसुद्धा केलेले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जमीर शेख यांनी केले, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर यांनी विधार्थानी परिपूर्ण अभ्यास करून आपले भविष्य घडविण्याचे आव्हान केले.जे विधार्थी परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करतील अश्या सर्व विध्यार्थाना संस्थेतर्फ लॅपटॉप देण्यात येईल अशी घोषणा केली.
कार्यक्रमाला विधार्थांचा उस्फुर्तपने सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. नवशाद यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.