सोमय्या पॉलीटेकनिक येथे राष्ट्रीय विज्ञान दिन
महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. देशाचे महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकेत रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थामधून जाणाऱ्या प्रकाशाच्या किरणात बदल करणारा हा बदल सी. वी. रमन यांनी लावलेल्या रमण इफेक्टच्या समरणार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन सोमय्या पॉलीटेकनिक येथे उत्साहाने साजरा करतात हे केवळ विज्ञानाशी संबधीत लोकांपुरते मर्यादित नसावे तर विविध क्षेत्रातील सहभागाचाही त्यात समावेश असावा. राष्ट्रीय विज्ञान दिन केवळ महान भारतीय शास्त्रज्ञ आणि त्याच्या महान शोधांपैकी एक साजरा करत नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून विज्ञानाचा प्रचार केला पाहिजे.
ह्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, संस्थापक सौ. अंकिता पियुष आंबटकर, विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थीत होते.