महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक अभियंता दिवस उत्सवात पार पडला या प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला मालार्पण करून यांच्या जन्मदिवस म्हणजे अभियंता दिनाचा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सोमय्या पॉलीटेकनिकचे संस्थापक श्री पि.एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पियुष पि.आंबटकर सौ.अंकिता पियूष आंबटकर प्राचार्य श्री जमीर शेख सर रजिस्टार बिसेन सर उपस्तिथ होते
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या १५ सप्टेंबर जन्मदिवसाचा निमित्त अभियंता दिवस दरवर्षी साजरा केला जातो मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिवस १५ सप्टेंबर १८६० रोजी झाला त्यांनी म्हैसूर सरकारचा मदतीने मुंबई विद्यापिटातून आपली सिव्हिंल इंजिनीयरची डिग्रि पूर्ण केलीण् त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार द्वारा नाशिक येथे साहाय्यक अभियंता पदावर काम केले त्यांच्याप्रयत्नातूनच कृष्णराज सागर धारण भद्रावती आर्यन अँड स्टील म्हैसूर संदल ऑईल अँड सोपं फॅक्टरी ए म्हैसूर विश्वविधालयची स्थापना झाली त्यांच्या कार्य मुळे त्यांना १९५५ मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सार्वजानिक जीवनात एक अभियंता म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे दरवर्षी त्यांच्या जन्मदिवस अभियंतादिन म्हणून देशात साजरा करण्यात येतो
याप्रसंगी संस्थांचे सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्तिथ होते.