मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय तातडीची बैठक

देवेंद्र फडनविस, राज ठाकरे सह 18 पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण

(ब्रेकिंग न्यूज)
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार आहेत.
मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा करणार आहेत. दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहेत. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते या बैठकीला असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण आहे.
याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहित आहे. उद्धव ठाकरे यांनी याआधीही ‘कोरोना’च्या संकट काळात राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सरकारला काय सूचना करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. तसेच एमआयएम, माकप, भाकप, शेकाप अशा लहानमोठ्या 18 पक्षांच्या नेत्यांनाही बोलावले आहे.

कोणकोणत्या पक्षांचे नेते होणार सहभागी

शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेस
भारतीय जनता पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
एमआयएम
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
शेतकरी कामगार पक्ष

Previous post मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप नाही मग होणार गुन्हा दाखल
Next post छत्रपती संभाजीराजेंच्या ‘त्या’ ट्विटनंतर देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News