पुणे, नागपूरसह हि तीन शहरे 31 मार्चपर्यंत शटडाउन

0 0
Read Time:2 Minute, 36 Second

    विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि मुंबई एमएमआरडीए येथे अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळपर्यंत राज्यात कोरोनाचे 52 प्रकरणे समोर आले आहेत. तर पुणे आणि मुंबईच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 5 कोरोना पीडितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना लवकरच घरी सोडले जाऊ शकते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक आणि बससेवा बंद करण्याची लोकांमधून मागणी होत आहे. पण या दोन्ही मुंबईच्या लाइफलाइन आहेत आणि यांना पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. यामुळे जे लोक कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी काम करत आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात करू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांना केले आहे. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दुकाने बंद करण्याचा निर्णयाचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरसवर तयार केलेली एक शॉर्टफिल्म रिलीज केली आहे. रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले आहे तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर कपूर, आलिया भट्ट, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसह अनेक नामवंत कलाकार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post विद्यार्थ्यांना पेपर देताना मास्क किंवा सॅनिटायझर बाळगण्याची परवानगी
Next post चार शहरे बंद

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News