Read Time:1 Minute, 47 Second
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
वृत्तसंस्था – नगरपालिका शिक्षण मंडळ,बार्शी व श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,बार्शी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अरुणा मठपती यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे माध्यमिक चे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर प्राथमिक चे उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे,बापू शितोळे सदस्य शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व अनिल बनसोडे प्रशासनाधिकारी न.पा. शि. मं. बार्शी,श्री.संजय पाटील पर्यवेक्षक ,महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्या. श्री.बाळासाहेब पाटील सर ,सुपरवायझर श्री.पाटील पी.पी.यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. . ..
मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम हॉल बार्शी येथे शाळेत विविध उपक्रम राबवून आपली उपक्रमशीलता दाखवलेल्या अरुणा मठपती यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्यासोबत आणखी २९ महिला शिक्षिका यांचाही सन्मान करण्यात आला.
Attachments area
,