महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि चंद्रपूर कॉलेजच्या प्रथम वर्षातील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी संस्था स्तरावर CIPET, व MIDC ताडाली चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली.
मान्यवरानी विध्यार्थाना टूल रूम,सीएनसी मशीन्सच्या संपर्कात येणे, सीएनसी ३ अॅक्सिस मिलिंग मशीन,सीएनसी लेथ मशीन,सीएनसी ईडीएम मशीन,सीएनसी वायर कट प्रक्रिया ,विभागात प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन्सच्या संदर्भात विध्यार्थाना माहिती दिली, विद्यार्थ्यांना उद्योगाचे काम, मशीन कशी काम करतात, कामगारांना किती वेळ लागतो, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, हे शिकण्यासाठी औद्योगिक भेट घेतल्या गेली.
CIPET येथील औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्लास्टिक अभियांत्रिकी आणि उत्पादन प्रक्रियेविषयी मौल्यवान माहिती मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व प्लास्टिक तंत्रज्ञानातील करिअरसाठी प्रेरणा मिळाली.
प्लास्टिक प्रक्रिया यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान, प्लास्टिक उत्पादनातील गुणवत्ता परीक्षण आणि नियंत्रणाचे महत्त्व, प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी संशोधनाचे महत्त्व या बद्धल महत्वपूर्ण माहिती मिळाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी CIPET मधील प्रशिक्षण अभ्यासक्रम, संशोधनाच्या संधी आणि उद्योगांसोबतच्या सहकार्य कार्यक्रमांबद्दल माहिती घेतली. भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले, ज्याचा उपयोग त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
तसेच एमआयडीसीयेथील भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक व्यवस्थापन याबद्दल प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. कच्च्या मालाचे प्रक्रिया केंद्र, फायबर एक्सट्रूजन, स्पिनिंग, विणकाम आणि गुणवत्ता तपासणी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले, ज्याचा उपयोग त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे ,प्रा. उज्जला सावरकर, प्रा. नीरजा बोनागिरी, प्रा. ईशान नंदनवार, प्रा. दिनेश बोपचे, प्रा. अमृता जोगी आणि प्रा.जयश्री आसुटकर उपस्थित होते.