सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विजयादशमी उत्साहात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,श्री.पियूष आंबटकर,सौ.अंकिता पि.आंबटकर,प्राचार्य श्री.जमीर शेख, प्राचार्य श्री. दीपक मस्के,रजिस्टर श्री.बिसन सर उपस्थित होते .
विजयादशमीच्या पर्वावर मेकॅनिकल विभागातील वर्कशॉपमधील सर्व साहित्यांची पूजा -अर्चना करण्यात आली तसेच इलेकट्रीकल विभाग, इलेकट्रॉनिक विभाग, सिव्हिल विभाग, मायनिग विभाग आणि संगणक विभाग मधील सर्व लॅबच्या साहित्याची पूजा करून प्रसाद वितरण करण्यात आला .
तसेच विजयादशमी पर्वाची माहिती देत नऊ दिवसाचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो आणि मग दारी येतो दसरा,देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याला मारले तसेच तोच हा दिवस प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा होय, अज्ञानावर ज्ञानाने , शत्रूवर पराक्रमाने विजय मिळविण्याचा आंनद, समाधान, यश, कीर्ती प्राप्त करायचे.
तसेच राम म्हणजे अतिशय अनंद देणारा आणि असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान व शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय, विजयादशमीच्या सर्वाना शुभेच्छा देत संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी आपले मत वक्त्त केले.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .