महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे ‘’जागतिक महिला दिन’’ साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, हयांनी विद्यार्थ्यांनसमोर आपले मनोगत व्यक्त्त केले, जागतिक महिला दिनाचे विशेष म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान त्यांनी केलेल्या कार्याची उपलब्धी त्यातून समाजातील इतर महिलांनी केली आहे. डॉ.टेसी थॉमस ही पहिली भारतीय महिला आहे,देशातील मिसाईल प्रोजेक्ट मध्ये काम करीत आहे,डॉ किरण बेदी भारतीय पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी पदावर असून ज्यांनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल रमण मैगसेस पुरस्कार देण्यात आला. भारताच्या पंतप्रधान इंदीरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, गानकोकिळा लता मंगेशकर, सुषमा स्वराज, उमा भारती, ममता बॅनर्जी यांनी सामाजिक,राजकीय,आर्थिक ,सांस्क्रुतीक तसेच भारतीय प्रसाशकीय सेवा, वैदयकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, स्वरंक्षण दले ,अशा कित्येक महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला आहे.
” आदी शक्ती तू ,प्रभूची भक्ती तू , झाशीची राणी तू, मावळ्याची भवानी तू ,विधात्याची नवं निर्माणाची कलाकृती तू ”
भारतात पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला, महिला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण करणे, स्त्रीपुरुष समानता, सामान अधिकार, मतदान अधिकारी अशा अधिकाराची माहिती दिली तसेच सर्वांना जागतिक महिला दिनाचा शुभेच्छा देऊन महिला प्राध्यापिकांना उपहार देण्यात आला .
ह्या कार्यक्रमाकरीत सर्वविभाग प्रमुख तसेच प्रा.बल्लमवार मॅडम, प्रा.धनश्री मॅडम, प्रा. माधवी मॅडम, प्रा.सोनम मॅडम, प्रा.स्नेहा मॅडम, प्रा. प्रियंका मॅडम, प्रा.मोहिनी मॅडम, प्रा.तृप्ती मॅडम, प्रा.सोनू मॅडम, लायब्ररीयन भारती मॅडम तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .