सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फ प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृहात मॅट्रीकोला २०२३

सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फ प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृहात मॅट्रीकोला २०२३

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फ मॅट्रीकोला आणि नवीन वर्षाचे २०२३ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव प्रीती पी.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य श्री. दीपक मस्के,रजिस्ट्रार श्री.बिसन सर विभागप्रमुख प्रा.खुजे, प्रा.डॉ.चव्हाण,प्रा.बोबडे,प्रा.नागराळे,प्रा.बल्लमवार,प्रा.कोटकर,प्रा.ठाकरे,मंचावर उपस्थित होते, सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून माँ भवानी,सरस्वती माता, आणि नटराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
मॅट्रीकोला २०२३ मध्ये सोमय्या पॉलीटेक्नीक ,सोमय्या आय. टी. आय., सोमय्या डी फार्म कॉलेज ,विधार्थांचा सहभाग होता. पॉलीटेक्नीक मध्ये प्रथम वर्षीय आणि डायरेक्ट द्रुतीय प्रवेशित विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये सांस्कृतिक समूह नुत्य,गीतगायन,एकलनुत्य स्पर्धे घेण्यात आले ,
प्रथम वर्षातील विधार्थामधून मिस्टर फ़ेशर मोहम्मद झिशान व मिसेस फ़ेशर शुभांगी पेरूका, निवड करण्यात आले, तसेच मिस्टर बेस्ट स्माईल यश पांढरे,बेस्ट कॉस्ट्यूम युवराज झंझाटे ,बेस्ट वॉक रोहित डे , मिस्टर हॅंडसॉम साहिल,मिसेस ब्युटीफुल ख़ुशी झाडे ,मिसेस बेस्ट स्माईल पायल गजघाटे ,मिसेस बेस्ट कॉस्ट्यूम मनीषा बिस्वास ,बेस्ट वॉक गौतमी ह्या विधार्थाना स्पर्धेमध्ये यश मिळाले.
तसेच सांस्कृतिक समूह नृत्यामध्ये पहिला क्रमांक इलेक्ट्रिकल तृतीय वर्षाच्या विधार्थानी पटकावला,द्रुतीय क्रमांक मायनिंगच्या विधार्थाचा,तसेच तृतीय क्रमांक, इलेट्रोनिक विभागाच्या विधार्थाना देण्यात आला,तसेच एकलनुत्य स्पर्धेमध्ये मेकॅनिकल तृतीय वर्ष,मायनिंग द्रुतीय वर्ष,आणि तृतीय क्रमांक इलेट्रोनिक विभागाच्या विधार्थांचा क्रमांक आला.तसेच गीतगायन स्पर्धेत हर्षता आकडे,आदर्श खडसे,साहिल मेश्राम,क्रमांक पटकाविला, सर्व विध्यर्थंना सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर यांनी विधार्थानी परिपूर्ण अभ्यास करून आपले भविष्य घडविण्याचे आव्हान केले.जे विधार्थी परीक्षेत उत्कृष्ट गुंन संपादन करतील अश्या सर्व विध्यार्थाना संस्थेतर्फ लॅपटॉप देण्यात येईल अशी घोषणा केली.
कार्यक्रमाला विधार्थांचा उस्फुर्तपने सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. नौशाद सिद्धकी यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post शिक्षणासोबत विध्यार्थ्यांच्या इतर गुणांना प्राध्यान्य ….. श्री. पी.एस .आंबटकर
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News