महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडगाव चंद्रपूर येथे दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. मा. प्रवीण अरोरा सर यांनी आंतरराष्ट्रीय पदवी (डिग्री ) व जागतिक दर्जाचे शिक्षणावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भारत आणि फ्रान्स देशातील शिक्षणपद्धतीं मधील मूलभूत फरक, शिष्यवृत्तीच्या संधी आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अनुभव याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “खरी शिक्षणपद्धती ही विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न विचारण्याची क्षमता देते.” त्यांनी या विचाराचा विस्तार करताना असे नमूद केले की, केवळ माहिती प्राप्त करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नाही, तर विचारशक्तीला धार देणे आहे, प्रश्न विचारण्याची आणि नव्या दृष्टीकोनातून समस्यांकडे पाहण्याची सवय लावणे हे खरे शिक्षण आहे. त्यांनी सांगितले की, आजच्या जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर आत्मचिंतन, तर्कशुद्ध विचार, आणि सामाजिक भान यांची जोड आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले की, “शिक्षणाचे खरे मूल्य हे केवळ परीक्षेतील गुणांमध्ये नसून, आपण समाजात बदल घडवू शकतो का, हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी त्याच्या जीवन प्रवासातून विद्याथ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी दोन वेगवेगळ्या देशांच्या शैक्षणिक पद्धतींचा फरक समजावून संगीतला. त्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन आणि करिअर संधी मोठ्या प्रमाणात वाढतात. फ्रान्समधील उच्च शिक्षण संस्थांशी भारतातील विद्यापीठांचे करार झाल्याने विद्यार्थ्यांना एक्स्चेंज प्रोग्राम, संयुक्त डिग्री आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होत आहेत.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा उपक्रम तरुणांना जागतिक स्तरावरच्या रोजगाराच्या संधींसाठी अधिक सक्षम करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन, डिझाइन, विज्ञान इत्यादी क्षेत्रांत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची मागणी वाढत आहे.
विद्यार्थ्यांसाठी हा भारत–फ्रान्स शिक्षण सहयोग एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, कारण यामुळे त्यांना परदेशी शिक्षणाचा अनुभव आणि जागतिक करिअरकडे जाण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर , उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर, संचालक अंकिता पी. आंबटकर , प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर, डॉ. उज्वला सावरकर मॅडम,व तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक ईशान नंदनवार सर यांनी केले आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
