सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज वडगाव, चंद्रपूर येथे इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी तर्फ विध्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर, डायरेक्टर अंकिता पी. आंबटकर, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर,  डॉ. उज्वला सावरकर मॅडम, सोमय्या पॉलीटेकनिक चे प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे सर, रजिस्ट्रार राजेश बिसेन सर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्था अध्यक्ष पी.एस.आंबटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

 

संस्था अध्यक्ष पी.एस. आंबटकर हयांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे इतिहास ध्येय व मिशन याची माहिती दिली. विविध विभागांचा सुविधांचे ओळख  करून दिली. शैक्षणिक, शिष्यवृत्ती, ग्रंथालय , विद्याथ्री, कल्याण योजना, व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शन सत्र , संस्थेच्या नियमाची व शिस्तीची माहिती, अँटी-रॅगिंग  आणि सुरक्षितता उपाय, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम / प्रतियोगिता यांची माहिती दिली.

 

कार्यक्र्माचा दुसरा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला. या दिवशी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंड्ळाचे (MIDC) इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मधुसूदन रुंगटा, MIDC चंद्रपूर विभाग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

 

“भारताचे भविष्य घडवणारे अभियंते”  या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी  संवाद साधला आपल्या भाषणात त्यांनी औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध संधी, स्टार्टअप संस्कृर्ती, सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आणि अभियंत्याची उद्योग विकासातली भूमिका याविषयी सखोल माहिती दिली.

तुमचं शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नसावं, तर उद्योग निर्माण करण्यासाठी असावं भारतासारख्या देशाला केवळ नोकरदार नव्हे तर उद्योजक अभियंतेचे हवे आहेत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले . येणाऱ्या पाच वर्षा मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येणार याची माहिती दिली.

तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी माहिती देण्यासाठी सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज येथील डीन डॉ. शितल कारपेटीवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे महत्व समजावून सांगितले आणि  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नौशाद सर यांनी केले.

या कार्यक्रमाचा यशश्वीतेकरीता सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या आयुर्वेद वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती जिल्हा : चंद्रपूर येथे जेष्ठ नागरीक (Geriatric ) ओ.पी.डी.चे शुभारंभ
Next post सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि येथे ” प्रारंभ “२K२५ “कार्यक्रमाचे आयोजन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News