
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली ,त्यामध्ये सर्वप्रथम कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थाअध्यक्ष पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर, रजिस्ट्रार राजेश बिसेन सर, डॉ. उज्वला सावरकर मॅडम उपस्थित होत.
सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीं यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले .
”सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हाच माझा देव आहे आणि अहिंसा हि त्या देवाची आराधना आहे”
प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे मोलाचे मार्गदर्शन करीत आज आपण गांधीजींचे विचार फक्त स्मरणात ठेवू नये, तर ते आपल्या कृतीत उतरविले पाहिजे. आजच्या तरुण पिढीने गांधीजींच्या विचारांकडे केवळ इतिहास म्हणून न पाहता, जीवन जगण्याचा मार्ग म्हणून पाहण्याची गरज आहे. डिजिटल युगात राहूनही, जर आपण गांधीजींच्या विचारांना आत्मसात केलं, तर आपलं समाज आणि देश दोन्ही सकारात्मक परिवर्तनाकडे वाटचाल करू शकतील.
“लाल बहादूर शास्त्री हे साधेपणाचे, प्रामाणिकपणाचे आणि राष्ट्रसेवेच्या निष्ठेचे प्रतीक होते. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या जवानांना आणि अन्नदाता शेतकऱ्यांना गौरव दिला.
तसेच प्रा. डॉ. उज्वला सावरकर मॅडम यांनी सांगितले कि, “गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. शास्त्रीजींनी देशासाठी प्रामाणिक सेवा दिली. प्रत्येकाने त्यांचं जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन सत्याच्या व अहिंसेच्या मार्गाने जीवन जगले पाहिजे व त्यांचे विचार स्मरणात आणले पाहिजे.
तसेच इतर मान्यवराने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार थोडक्यात मांडले.
या कार्यक्रमाचा यशश्वीतेकरीता सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
