सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि चंद्रपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपरिचय उपक्रम (इंडक्शन प्रोग्राम)

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या  इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि चंद्रपूर कॉलेजच्या  विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पि.आंबटकर , प्रा.श्री.एम.झे .शेख ,प्रा.अ.खुजे मंचावर उपस्थित होते.

प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश  घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपरिचय उपक्रम (इंडक्शन प्रोग्राम) राबवला आला आहे. हा कार्यक्रम शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या आठवड्यात हा उपक्रम असून त्यामध्ये  संस्थेतील प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद निर्माण व्हावा, त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेता यावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, व्यक्तिमत्त्व विकास, संगणकीय सुविधा, त्यांचे महत्त्व, विविध अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच्या करिअर संधी, यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद या मुद्द्यांचा समावेश होता.

सोमय्या ग्रुप आज विदर्भात नव्हे तर महारष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते,याला कारणही तसेच आहे,संस्थेचे संस्थापक श्री.पी,एस.आंबटकर यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केले,सर्व सुविधांनी युक्त्त आणि दर्जेदार शिक्षण या संस्थेचा पाया आहे,या संस्थेने येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात  करून आगेकुच केले,हजारो विध्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाची पेरणी केली,आज येथील  विध्यार्थी केवळ भारतात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात आपली छाप सोडून आहे.त्याप्रमाणे विध्यार्थ्याच्या प्रगतीची काळजी संस्थापक घेतात त्याचप्रमाणे शिक्षकांना त्याच्या प्रगतीची संधी देतात याचे उदाहरण म्हणजे शिक्षकांना शैक्षणिक प्रगती करीता  शिक्षकांना कश्मीर भ्रमंती करण्यासाठी नेले तसेच याअगोदर थायलँड बह्म्मती करण्यसाठी शिक्षकांना संधी दिली,शिक्षकाची प्रगती म्हणजे विध्यार्थ्याची प्रगती असते.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे वर्कशॉप विभागतर्फ विश्वकर्मा जयंती साजरी
Next post जागतिक फार्मसिस्ट दिवसाचे औचित्य साधून सोमय्या फार्मासि चंद्रपूर कॉलेजच्या विध्यार्थाचे विविध स्पर्धेत यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News