” वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघनः कुरूमे देव सर्वकार्यषु सर्वदा ”
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत गणेशविसर्जन कार्यक्रम भक्तिभावाने करण्यात आले , संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, उपप्राचार्य जमीर शेख, प्रा. जोगे, प्रा.राजकुमार ,रजिस्ट्रार बिसन सर उपस्थित होते.
विघ्णहर्ता श्री.मंगलमूर्ती …..तुमच्या सगळ्या चिंता,दुःख,प्रापंचित विवचना दूर करो,तुम्हाला सुफळ -संपन्न होऊ दे,….हीच माझ्याकडून त्या विद्येच्या देवता ,बम्हण्ड नायकाकडे हात जोडून मनापासून पार्थना आहे .
गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी , श्री गणेशाय नम: ‘ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे.
अखेर तो दिवस आला आहे जिथे सर्व गणेश भक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्याची वेळ आली ,अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या सर्व भक्ताचा निरोप घेत संस्थेच्या वेदना , दुःख आणि जीवनातील अड्थडे घेऊन जावो ,श्री.गणेशाला विद्या ,शिक्षण ,समृद्धीचे प्रतीक मानले जाते, याच कारणांमुळे त्याला गजानन,धूम्रकेतु ,एकदंत, वक्रतुंड ,सिद्धिविनायक,आदी वेगवेगळया नावानी ओळखल्या जाते. प्रपंचींत विवंचना दूर करो आणि तुम्हाला सुफळ संपन्न होवू दे …. हीच कामन करता श्री.गणेशाला निरोप देत ”गणपती बाप्पा मोरया ,पुढचा वर्षी लवकर या ”…. विधार्थानी कामना करीत बाप्पाला निरोप दिला.
या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते .