ISTE स्व-प्रायोजित एक आठवड्याचा ऑनलाइन FDP यशस्वी चंद्रपूर : सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ISTE स्व-प्रायोजित एक आठवड्याचा ऑनलाइन FDP यशस्वी

सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, चंद्रपूर येथे ISTE स्व-प्रायोजित एक आठवड्याचा ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) दि. 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे पार पडला. या कार्यकारिणी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. बी.डायगव्हाने,डॉ. जी. के. आवारी, डॉ. डी. के. परबत, प्रा. रितेश बाणपूरकर, डॉ. अभिजीत राऊत, डॉ. संजय राजुरकर, डॉ. राजकुमार पंत, डॉ. राजेश्री राऊत, प्राचार्य जमीर शेख उपस्थित होते, या FDP मध्ये Industry 4.0, Sustainable Engineering, Additive Manufacturing व 3D Printing या आधुनिक विषयांवर देशातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ पार पडला. उद्घाटनानंतर डॉ. एम. बी. डायगव्हाने संयुक्त संचालक, डीटीई प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी Industry 4.0 या विषयावर व्याख्यान दिले. उद्घाटनप्रसंगी डॉ. एम. बी. डायगव्हाने व डॉ. जी. के. आवारी, IEI महाराष्ट्र राज्य केंद्र सदस्य व विभागप्रमुख, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, शासकीय पॉलिटेक्निक, नागपूर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य जमीर शेख उपस्थित होते.

 

दुसऱ्या दिवशी डॉ. डी. के. परबत, विभागप्रमुख, सिव्हिल इंजिनिअरिंग, शासकीय पॉलिटेक्निक, नागपूर यांनी Sustainable Environment Engineering : Real-Life Application & Integrated System या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. जी. के. आवारी यांनी Introduction to Additive Manufacturing and 3D Printing या विषयाची माहिती दिली.

 

तिसऱ्या दिवशी प्रा. रितेश बाणपूरकर, डीन IQAC, तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर यांनी Materials of 3D Printing या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अभिजीत राऊत, सहाय्यक प्राध्यापक, रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर यांनी 3D Printing in Biomedical Engineering : Technologies, Processes and Real-World Case Studies या विषयावर सखोल विवेचन केले.

 

चौथ्या दिवशी डॉ. संजय राजुरकर, डीन अकॅडमिक्स, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांनी Applications of 3D Printing या विषयावर मार्गदर्शन केले.

 

पाचव्या व अंतिम दिवशी डॉ. राजकुमार पंत, प्राध्यापक व विभागप्रमुख, एरोस्पेस इंजिनिअरिंग, IIT बॉम्बे यांनी Application of 3D Printing in Aerospace Engineering या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर समारोप व अभिप्राय सत्र पार पडले. समारोपप्रसंगी डॉ. राजेश्री राऊत, डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर व ISTE नवी दिल्ली कार्यकारिणी सदस्य या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमाचे FDP समन्वयक प्रा. अमित ठाकरे व श्री. आशीष भरडकर होते. कार्यक्रम समन्वयक प्रा. श्री. भारत  बाबरे होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. श्री. नौशाद सिद्दीकी यांनी केले. या FDP मध्ये विविध पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता .

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
Next post MSPM ग्रुप येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News